चंद्रपूर - तब्बल 3 महिन्यांनी राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
3 महिन्याच्या कालावधीत नागरिकांनी सुद्धा कोरोना काळातील नियम धाब्यावर बसविले, सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझर चा वापर नागरिकांनी कमी केला.
बाजारात नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होते मात्र चंद्रपूर मनपा सुद्धा यावर कसलीही कारवाई करीत नव्हती. #News34Chandrapur
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार लॉकडाउन सारखी परिस्थिती निर्माण व्हायला नको यासाठी नागरिकांनी कोरोना नियम सक्तीने पाळणे गरजेचे असल्याचे म्हटले होते.
आज चंद्रपुरात शहर पोलीस स्टेशन समोर पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात मास्कविना असलेल्या नागरिकांवर कारवाई करून दंड वसुली करण्यात आली.
नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टनसिंगचा वापर नेहमी करावा असे आवाहन आंभोरे यांनी नागरिकांना केले.
