चंद्रपूर - : सरकारी कोळसा कंपनी WCL (western coalfield limited)अंतर्गत काम करणा-या GRN कंस्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयात मनसेने स्थानिकांना रोजगार दिला जात नसल्याच्या मुद्द्यावरून प्रचंड तोडफोड केली. #News34Chandrapur
वेकोलीच्या भटाळी येथील कोळसा खाणीवर खोदकाम करणारी ही कंपनी स्थानिकांवर अन्यायासह कामगार हिताकडे दुर्लक्ष करत असल्याचं कारण देत मनसे शहराध्यक्ष मनदीप रोडे यांनी दिल.
कार्यालयातील सामानाची मोडतोड- वाहनांची नासधूस- CCTV तोडणे यासह कोळसा खोदकामासाठी लागणा-या जेसीबीची तोडफोड केली, ही तोडफोड केल्यावर लगेच मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे हे पसार झाले.
