ताजी बातमी - देशाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी देशभरात उत्साहाने साजरी होते.
मात्र कोरोना विषाणू संसर्गात सध्या सर्व जग आवळल्या गेलं आहे म्हणून यंदाची शिवजयंती शिवप्रेमी, नागरिकांना कोरोना नियम पाळून साजरी करावी लागणार आहे.
कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी नियमावली बंधनकारक असून प्रशासनाने यासाठी सण उत्सव आयोजनाची परवानगी नाकारली आहे, यावर गृहमंत्रालयाने नियमावली जाहीर केली आहे. #News34Chandrapur
गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी, मिरवणूक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी, फक्त 10 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी, मिरवणूक किंवा बाईक रॅली काढू नये, आरोग्यविषयक उपक्रमे व शिबिरांची जनजागृती करावी, सोशल डिस्टनसिंग व स्वच्छतेविषयक नियम पाळण्याकडे लक्ष द्यावे, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी होणार असे कार्यक्रम आयोजकांनी रद्द करावे, पोवाडे, व्याख्यान, कीर्तन मिरवणूक काढण्यास मनाई असून केवळ ऑनलाइन पध्दतीने कार्यक्रम घ्या असे गृह खात्यातर्फे सांगण्यात आले आहे.
