प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - केंद्र सरकार वारंवार पेट्रोल, डीझल व गॅस दरवाढ करीत असल्याने सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडल्या जात आहे, वाढलेल्या किमतीवर नियंत्रण आणणे तर सोडा केंद्र सरकार पुन्हा नवीन कर यावर लावत आहे.
घुगूस कांग्रेसतर्फे 11 फेब्रुवारीला पेट्रोल, डीझल व गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले, आंदोलन प्रसंगी घुगूस येथील बोंबले पेट्रोल पंपावरील पंतप्रधान मोदी यांचे लागलेले बॅनर दिसताच युवक कांग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सूरज कन्नूर,शहर अध्यक्ष तौफिक सुभान शेख, युवा नेते निखिल पुनगंटी व अंकेश मडावी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या फोटोवर काळे फासण्यास सुरुवात केली, घुगूस पोलिसांनी कांग्रेस कार्यकर्त्यांच्या या प्रकारावर गुन्हे दाखल केले आहे.
