चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल, डीझल व गॅस सिलेंडरची दरवाढ होत आहे, या दरवाढीमुळे आधीच देशात महागाई वाढत असून केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीविरोधात नियंत्रण करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले.
केंद्र सरकारच्या विरोधात दिवसेंदिवस होत असलेल्या गॅस सिलेंडरच्या दरवाढीने गृहिणींचे बजट पूर्णपणे कोलमडून गेले आहे. या विरोधात आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंप वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोसमोर चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला राष्ट्रवादी कांग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शहराध्यक्ष ज्योती रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवळे, पूजा शेरकी, रेखा जाधव, दयाबाई गोवर्धन, वंदना जांभुळकर, स्वेता रामटेके, शोभा घरडे आदींची उपस्थिती होती.