वरोरा - शहरातील बोर्डा चौक हे वर्दळीचे ठिकाण येथून चंद्रपूर कडे करणाऱ्या येणाऱ्याची संख्या भरमसाठ असते. #news34
आज दुपारी या चौकातील ऑटो स्टँड वर अचानक काळी पिवळी जीप थांबली व ड्रायव्हर ने मागे पुढे न पाहता अचानक आपल्या बाजूचे दार उघडले, दार उघडले तोवरच दुचाकी स्वार रोहन उर्फ जॅकी माटे 24 वर्ष रा व्होल्टास सागर कॉलनी वरोरा येऊन त्या दरवाज्याला धडकला व रोडवर कोसळला तेवढ्यातच बाजूने जाणारी नागपूर सिरोंचा बस क्र. MH40 AQ 6420 या बस च्या मागच्या चाकात रोहन आला व जागेवरच त्याचा मृत्यू झाला.काळी पिवळी चा चालक गाडी सोडून पळून गेला.रोहन ला पोस्टमोर्टम करिता वरोरा उप जिल्हा रुग्णालयात नेले आहे.