औरंगाबाद - राज्याचे ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार अचानक अधिकाऱ्यांवर भडकले असता बैठकीत स्मशान शांतताच पसरून गेली होती.
सिल्लोड येथील सोयगाव मतदारसंघात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, तहसीलदार ते कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची थातुरमातुर यादी बघताच सत्तारांचा पारा चढला, "तुम्ही फुकटचा पगार घेता का? तुमच्या बापाने कधी अस काम केलं का?"
पंचायत समितीमध्ये काम करताना पगार मिळत नाही काय? ज्यावेळी काम करण्यासाठी पैसे मागता तेव्हा कशे खुश होता, असे भिकारचोट धंदे बंद करा, नाहीतर माझ्यासारखा वाईट माणूस नाही, गरिबांच्या घरकुल योजना पूर्ण करा, नागरिकांनी आम्हाला सत्ता दिली आहे त्यांची कामे झाली नाही तर ते उद्या आमचे कान पकडणार, घरकुल लाभार्थी यांची जश्याची तशीच यादी अधिकाऱ्यांनी दिली असता मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. #News34Chandrapur
