चंद्रपूर - वर्ष 2015 ला चंद्रपूर जिल्हा दारूबंदी घोषित करण्यात आला, त्यानंतर जिल्ह्याचं चित्र अतिशय विदारक होत गेलं, अवैध दारूचा महापूर, गुन्हेगारांचा घोळका, अवैध दारूविक्री मध्ये महीला व बाल गुन्हेगारी अश्या अनेक प्रकरणी चंद्रपूरची दारूबंदी चांगलीच गाजली.
अवैध दारू वाहतूक थांबविण्यात पोलीस उपनिरीक्षकांचा मृत्यू झाला.
सरकार बदलली आता जिल्ह्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्याचा जणू संकल्प केला आहे.
यासाठी उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यातील नागरिकांना लेखी अभिप्राय दारूबंदी बाबत मागविले मात्र तो अहवाल तसाच आहे. #News34Chandrapur
आता त्या अहवालावर 12 जानेवारीला दारूबंदीचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमली.
1 महिन्यात या समितीला शासनासमोर अहवाल द्यायचा होता, महिन्याभरात समितीद्वारे 7 बैठका झाल्या मात्र ठोस निर्णय झाला नाही म्हणून आता समितीची 7 मार्चपर्यंत मुदतवाढ करण्यात आली.
अजून अनेक विषयांवर चर्चा व्हायची असल्याने ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सांगितल्या जात आहे.
कांग्रेस सरकार मध्ये सुद्धा दारूबंदी करण्यासाठी समिती नेमल्या गेली होती मात्र त्याचा अहवाल कधी बाहेर आला नाही, आता दारूबंदी उठविण्यासाठी त्याची पुनरावृत्ती झाली आहे.
विशेष म्हणजे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी 3 वेळा नागरिकांना सांगितले की लवकरच दारूबंदी उठविण्यात येणार आहे मात्र ती तारीख होती जी कधी आली नाही.
मात्र या दारुबंदीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात मोहल्ला समिती गठीत करून मागेल त्याला अवैध दारूचा रोजगार देण्यात आला व तो यशस्वी सुद्धा झाला.
यासाठी अवैध दारू विक्री करणाऱ्याला मोठी रक्कम संबंधितांना द्यावी लागते तेव्हाच ही अवैध दारूविक्री सुरू करण्यात येते.
आता पुन्हा नव्या लोकांना अवैध दारू विक्री करण्याचा व्यापार करण्यास परवानगी मिळाली आहे, महिन्याचा कोटा ठरविण्यात आला असून चिल्लर विक्रेत्यांना घरपोच अवैध दारू ची डिलिव्हरी मिळणार आहे.
दारूबंदी चे विदारक चित्र नागरिकांसमोर असूनही हे समितीच सोंग कशाला करण्यात आले हा न समजण्यासारखा प्रश्न आहे.
