चंद्रपूर - नगरसेवक म्हणजेचं प्रभागातील नागरिकांच्या मदतीला नेहमी धावून जाणारा जनप्रतिनिधी, पण हा जनप्रतिनिधी जर तुमच्या अब्रूवर उठणार असेल तेव्हा काय?
असाच एक प्रकार चंद्रपूर शहरातील सरकारनगर येथे घडला.
पाणी टंकी जवळ राहणारी अविवाहित युवतीचे त्या ठिकाणी घर आहे, त्या घर व जागेची ती स्वतः भोगवटदार सुद्धा आहे, पण त्या युवतीला तिच्या घरातूनच बाहेर हाकलण्याचा प्रकार घडला.
सरकार नगर येथे राहणाऱ्या वंदना वानखेडे व गंगाधर वानखेडे यांनी हा प्रकार भाजप नगरसेवक संदीप आवारी यांच्या सहकार्याने केला असल्याचा आरोप त्या युवतीने पत्रपरिषदेत केला.
त्या युवतीच्या घराच्या जागेवर आमचा मालकी हक्क आहे असे नोटरी असलेले कागदपत्रे दाखवली मात्र सदर युवतीकडे जागेचा मालकी हक्क असल्याचा पुरावा असल्याने वानखेडे यांनी जबरदस्ती त्या युवतीच्या घरी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
युवतीने तात्काळ या घटनेनंतर सरकारनगर प्रभागातील भाजपचे नगरसेवक संदीप आवारी यांना मदतिची हाक दिली मात्र नगरसेवकाने चक्क त्या युवतीला शरीर सुखाची मागणी केली व तू माझी गोष्ट ऐकली तर मी सर्व सांभाळतो.
अश्या प्रकारचे शब्द ऐकल्यावर ती युवती स्तब्ध झाली तिने रामनगर पोलीस स्टेशन गाठले मात्र पोलिसांनी सुद्धा तिची तक्रार घेतली नसल्याने तिने आज पत्रपरिषद घेत पोलीस प्रशासन मला सहकार्य करीत नसून उलट माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आज मी स्वतः घरून निघून जावे याकरिता संदीप आवारी व वानखेडे दाम्पत्य रोज मला धमकी देत आहे, माझ्या जीवाला धोका असून पोलीस प्रशासनाने मला सहकार्य करावे अशी मागणी पत्रपरिषदेत केली.
या सर्व घडामोडींवर नगरसेवक संदीप आवारी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी त्या मुलीसोबत काही संबंध नसल्याचे सांगितले, ज्यावेळी वानखेडे व त्यांच्यात वाद सुरू होता त्यावेळी ती युवती घरी आली होती, त्यावेळी माझी पत्नी सुद्धा उपस्थित होती, मी त्या युवतीला सरळ सांगितले की हा तुमचा घरगुती वाद असून त्यामध्ये मी काही करू शकत नाही, जर मी काही खोट बोलत असेल तर माझी व त्या युवतीचा नार्को टेस्ट करण्यात यावा, जर मी खोटं बोलत असेल तर राजकारणातून संन्यास घेणार.
आरोप-प्रत्यारोप आज कुणीही कुणावर करीत असून या प्रकरणात किती तथ्य आहे? हे कुणालाही माहीत नाहीच.
