चंद्रपूर :- चिमूर विधानसभेचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया हे कुटुंबिय- नातेवाईकांसह बसमध्ये राजस्थान येथील सालासर हनुमान मंदिर बघायला जात असताना रॉंग साईड , वाहन टाकून पोलिसांशी दादागिरी केल्याप्रकरणी आमदार कीर्तिकुमार भांगडिया याने त्याच्या वडिलांसह काही जणाविरूद्ध शांततेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. #News34Chandrapur
दुपारच्या सुमारास बसचालक सीकरजवळ भटकंती करून शहरात शिरला. शहरातील एसके हॉस्पिटल जवळ ट्राफिक महिला पोलिस कमला आणि हेडकॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनी बस थांबविली. तेथे हेड कॉन्स्टेबल गिरधारी सिंग यांनीही बस चालकाच्या जड वाहन द्वारे शहरात प्रवेश बंदी असताना सुद्धा प्रवेश केल्याप्रकरणी 500 रुपयांचे चालान कापले.
वाहनांची चौकशी केली असता, माझ्या बसची चौकशी का करता,मी महाराष्ट्राचा आमदार आहे. माझ्या वाहनांची तपासणी करायची नाही असे म्हणून राजस्थान पोलिसांसोबत कीर्तिकुमार भांगडिया यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. तेव्हा आमदार भांगडीया यांनी पोलीस कर्मचार्यांवर हातापायी झाल्याची चर्चा सुरू आहे. इतकेच नव्हे तर एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत शिवीगाळ करून धमकी दिली. या भांडणात हेड कॉन्स्टेबल गिरीधर सिंग यांचा गणवेश फाडून त्यांच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. आमदार कीर्ति कुमार भांगडीया, माजी आमदार मितेश भांगडीया यांच्यावर शांतता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
