चंद्रपूर - शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडी व दुचाकी वाहन चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती.
असे अनेक गुन्हे जिल्ह्यात व शहरात वाढत असताना जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना सदर गुन्हे उघडकीस आणावे यासाठी आदेशीत केले.
यानंतर पोलीस निरीक्षक खाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांना घरफोडी व दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपवली.
पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांनी तात्काळ एक पथक तयार केले. पथकाने चोरीच्या गुन्ह्यात सामील असलेल्या 4 जणांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यानी विविध गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली.
घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल एकूण 2 लाख 35 हजारांचा जप्त करण्यात आला.
यामध्ये आरोपी PWD वसाहत बंगाली कॅम्प निवासी 27 वर्षीय रोहित शेट्टी, इंदिरानगर येथील 19 वर्षीय प्रवीण हांडी, एकता चौक, तुकूम येथील 38 वर्षीय मोहम्मद इमरान शेख, तुकूम येथील 19 वर्षीय अमन खान यांना ताब्यात घेत पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. #News34Chandrapur
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे सह पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, राजेंद्र खनके, महेंद्र बुजाडे, जमीर पठाण, अलुप डांगे, संदीप मूळे व जावेद सिद्दीकी यांनी यशस्वीतेने पार पाडली.
