जळगाव - रविवारी रात्री जळगावच्याया यावल तालुक्यात चौपडा मार्गावर वळण घेत असताना ट्रक पलटी झाल्याने 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर 2 गंभीर जखमी झाले.
यावल तालुक्यातील कीनगाव जवळ हा दुर्दैवी अपघात घडला, पपई घेऊन हा ट्रक बाजारपेठेत निघाला होता, पपई वर ते सर्व मजूर बसले होते, रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे असल्याने वळण घेत असताना ट्रक चालकाचा वाहनवरून ताबा सुटला व ट्रक पलटी झाला.
घटनेची माहिती मिळताच जळगाव व यावल पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, क्रेन च्या साहाय्याने पलटी झालेला ट्रक सरळ करण्यात आला, त्यानंतर मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
