चंद्रपूर - दि.15/02/2021 ला महावितरण चंद्रपूर उपविभाग क्र.1 अंतर्गत हॉस्पिटल शाखा वीज वितरण केन्द्र चंद्रपूर येथील मुख्य तंत्रज्ञ श्री प्रेमानंद खंडाळे, तंत्रज्ञ श्री महेश कातकर, तंत्रज्ञ श्रीमती सरला झाडे, प्रशिक्षणार्थी कु.गणेश वासेकर हे थकबाकी वसुली मोहीम अंतर्गत वीजबिल वसुली साठी गेले असताना चंद्रपूर येथील जटपुरा गेट जवळील कुरेशी बिल्डींग येथे कुरेशी याची थकबाकी वसुली दरम्यान विज बिल भरण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे खुर्चीवर उभे होऊन वीज पुरवठा खंडित करतेवेळी साजिद कुरेशी यांनी तंत्रज्ञ श्री महेश कातकर यांना जोराचा धक्का देऊन खुर्चीवरून खाली पाडले व साजिद कुरेशी यांचे बंधु मोहम्मद शाहिद कुरेशी यांनी मुख्य तंत्रज्ञ प्रेमानंद खंडाळे यांना धक्काबुक्की केली असून उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना अतिशय खालच्या पातळीवर अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची दिली. #news34chandrapur
या संदर्भातील बातमी अनेक वृत्तपत्रे व वेब न्यूज वर प्रसारित झाली होती मात्र सदर प्रेसनोट वर आरोपीच्या नावात महावितरणकडून चुकी झाली असल्याने भलत्याच कुरेशी बंधूंचे नाव त्यामध्ये आले.
आरोपीमध्ये मोहम्मद गालिब कुरेशी व अब्दुल गालिब कुरेशी हे होते, या प्रेसनोट मध्ये साजिद व शाहिद कुरेशी यांची नावे चुकीने प्रसिद्ध झाले असे मान्य करीत महावितरण कार्यालयाद्वारे दिलगिरी व्यक्त करण्यात आली, मात्र या चुकीचा फटका साजिद व शाहिद कुरेशी यांना बसला, समाजात व शहरात असलेलं त्यांच नाव महावितरणच्या चुकीने नाहक प्रसिद्ध करण्यात आले.
सदर घटनेची नोंद घेत असून सदर इसमावर FIR NO.103 नुसार दि.16/02/202 अन्वये कलम 353,188,294,34 नुसार गुन्हा नोंदविला आहे व अटक करण्यात आली आहे. कुरेशी यांच्या कडे दोन मीटर असून ग्रा. क्र.1) 450010506781, 2) 450010609017 वर एकूण माहे मार्च 2020 पासून थकबाकी अनुक्रमे रू.27700/- व 18,680/- होती सदर ग्राहकाला वीजबिल थकबाकी संबंधित दिनांक 22/01/2021 रोजी तंत्रज्ञ श्रीमती सरला झाडे यांनी नोटीस देण्यास गेले असता नोटीस धुडकावून लावून वीज बिल भरण्यास स्पष्ट नकार दिला व शिवीगाळ केली होती.
चंद्रपूर शहर पोलिसांनी 353,188,294,34 अंतर्गत गुन्हा दाखल करत अब्दुल गालिब कुरेशी व मोहम्मद गालिब कुरेशी यास अटक करण्यात आली आहे.
