चंद्रपूर - औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ख्याती आहे, बाहेर राज्यातील हजारो कामगार चंद्रपूर जिल्ह्यात रोजगारासाठी येत असतात, मात्र वर्ष 2015 च्या दारुबंदीनंतर कामगारांचा कल जिल्ह्यात कमी झाला, अनेक प्रकल्पाचे काम करण्यासाठी जिल्ह्यात कामगार सहसा मिळत नाही.
दारूबंदी झाल्यानंतर जिल्ह्यात दारू माफिया सक्रिय होणारच आहे, वर्ष 2015 ला एप्रिल महिन्यात दारूबंदीची घोषणा झाली, त्यानंतर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून संदीप दिवाण रुजू झाले, त्यांनी अवैध दारूवर हजारो कारवाया केल्या, कोट्यवधींची दारू व मुद्देमाल जप्त केला, त्यानंतर नियती ठाकर या पोलीस अधीक्षक पदी रुजू झाल्या मात्र त्या जास्त काळ जिल्ह्यात टिकू शकल्या नाही. Lcb Chandrapur
गडचिरोली जिल्ह्यातून डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हा अधीक्षक पदाचे सूत्रे सांभाळली त्यांच्या कार्यकाळात सुद्धा अवैध दारू, रेती तस्करी, अंमली पदार्थ वर अनेक कारवाई करण्यात आली होती.
याच दरम्यान पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांचा अवैध दारू तस्करांनी जीव घेतला मात्र त्यावेळी पोलिसांनी न डगमगता जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणले. News34 chandrapur
दारूबंदी काळात अनेक चांगले पोलीस निरीक्षक जिल्ह्याला लाभले, त्यांनी अवैध धंद्यावर चांगल्या प्रकारे कार्य करीत अंकुश आणले होते पण ते म्हणतात न चोरांना हजारो मार्ग असतात.
त्या चोर मार्गाने अवैध दारूची वाहतूक सुरू झाली, पोलिसांनी आपली जबाबदारी त्यावेळेस सुद्धा चोखपणे पार पाडली.
पण अवैध दारू, वाळू माफिया, अंमली पदार्थ असे अनेक अवैध धंदे नव्याने उदयास आले, मात्र पोलीस या काळात पण आपलं कर्तव्य बजावीत आहेत.
2 दिवसापूर्वी चंद्रपूरचे आमदार जोरगेवार यांनी कोट्यवधी रुपयांची अवैध दारू पकडली त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दूरध्वनी वर संपर्क साधत घटनास्थळी येण्यास सांगितले मात्र मी येऊ शकत नाही आपण स्थानिक पोलीस स्टेशनला याबाबत माहिती द्यावी असे सांगितले.
कारण जिल्ह्यातील घुगूस येथे 22 वर्षीय शुभम फुटाणे या युवकाच अपहरणाचा तपास खाडे यांचेकडे असताना त्यांची चमू बाहेर रवाना झाली आहे, मात्र खाडे यांनी तस सांगितलं नसावं याकरिता आमदार त्यांच्या वक्तव्यावर जाम भडकले.
मात्र त्यानंतर महाविकास आघाडी व अन्य पक्षांनी जिल्हा पोलिस अधिक्षक साळवे यांची भेट घेत खाडे यांचं निलंबन करण्याची मागणी केली कारण त्यांनी लोकप्रतिनिधीनी त्यांना घटनास्थळी बोलावले असता ते आले नाही.
स्थानिक गुन्हे शाखा हे महत्त्वाचं पद आहे, या विभागाच काम म्हणजे गुन्ह्यांचा शोध लावणं, खाडे यांनी जेव्हा स्थानिक गुन्हे शाखेची सूत्रे सांभाळली त्यावेळी मनोज अधिकारी हत्याकांड चर्चेत होते या प्रकरणातील आरोपी 4 महिन्यापासून पोलिसांना चकमा देत होती मात्र खाडे यांनी त्या आरोपीला आठवड्याभरातचं अटक केली.
अवैध दारूवर कारवाई केली, नागभीड मधील अपहरण नाट्य त्यांनी अवघ्या 5 तासात उघडकीस आणले. काही दिवसांपूर्वी त्यांनी जंगलातून दारूचा ट्रक पकडला होता.
मात्र काहींनी त्यांच्या कार्यप्रणालीवर शंका घेत निलंबन करण्याची मागणी करून टाकली.
दारुबंदीला आज 6 वर्षे होत आहे, या 6 वर्षाच्या कालावधीत एकाही जनप्रतिनिधीने कधीही अवैध दारू का पकडली नाही? अंमली पदार्थ, वाळू तस्करी, सुगंधित तंबाखू वर किती जनप्रतिनिधी पुढे आले मग आताच का? हा प्रश्न म्हणजे कधी न सुटणार कोड आहे.
राजुरा येथे 70 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला होता मात्र त्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा राजकीय पक्षाचा पदाधिकारी होता त्यावेळी हे जनप्रतिनिधी पुढे का आले नाही?
अवैध दारू तस्करी पकडण्याच काम पोलीस करीतच आहे, मात्र उत्पादन शुल्क विभाग काय करीत आहे? याबद्दल आजपर्यंत कुणी का बरं बोलले नाही.
प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आहेच, तसेच वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभाग आहेतच.
मग या सर्वांच खापर पोलीस विभागावरचं का फोडल्या जाते? Chandrapur Police
चांगले अधिकारी जिल्ह्यात आले तर अवैध धंदे करणारे राजकारणी त्यांच्यावर दबाव आणण्याच काम करतात त्यावेळी हे तक्रार करणारे जनप्रतिनिधी जातात तरी कुठे?
दारुबंदीनंतर राजकारण्यांसोबत लगट असणारे अनेक कार्यकर्ते अवैध दारू तस्करीत मिळाले होते, आजही हे लगट कार्यकर्ते दारूचा व्यवसाय करीत आहे, मग अश्यावेळी का बरं हे जनप्रतिनिधी अवैध धंद्याविरोधात आवाज उचलत नाही? जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात हेच जनप्रतिनिधी आवाज उचलतात मात्र काही काळानंतर गप्प होतात पण का? या बाबीचा कुणी शोध लावला का? यामध्ये पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्यावर आरोप करायचे हा नित्यक्रम सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झाला आहे.
पोलीस आजही चंद्रपूर जिल्ह्यात कायद्याने वागत आहे मात्र स्वतःचे धंदे लपविणारे व्हाइट कॉलर लोक पोलिसांवर आपले खापर फोडत आहे म्हणून चंद्रपूर नेहमीच चांगल्या अधिकाऱ्यांना मुकत आलेला आहे.
पोलीस सुद्धा खाकी वर्दीतला एक माणूसच आहे, वर्षानुवर्षे बदली, नवीन शहर या सर्व मानसीकतेमधून ते आपलं कर्तव्य बजावीताना दिसत आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खाडे यांची ओळख "डॅशिंग अधिकारी" म्हणून आहे, ते याआधी ब्रह्मपुरीत असतांना अवैध दारू विक्रेत्याने ऑटो चालकाच्या परिवाराला मारहाण केली होती त्यावेळी खाडे यांनी त्या पीडित परिवाराला न्याय देण्याच काम करीत, अवैध दारू विक्रेत्याला चोपत बेड्या ठोकल्या होत्या.
अश्या पोलीस निरीक्षकांची गरज चंद्रपूर जिल्ह्याला आहेत. मात्र काही राजकारणी राजकीय दबाव दाखवीत खाडे यांची बदली करण्यासाठी लॉबिंग करीत असल्याची माहिती आहे.
