कोरपना - जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात चढाओढ सुरू झाली आहे, अवैध धंद्यांचं क्षेत्र असो की दुसरे एकाने काही काम केलं की दुसरे त्याच्यावर चढाओढ करण्याचा प्रयत्न करतात.
आता हेच चित्र कामगार क्षेत्रात बघायला मिळत आहे, जिल्ह्यात कामगार क्षेत्रात सर्वात मोठे नाव कामगार नेते नरेश पुगलिया यांचं आहे, नेहमी कामगारांच्या हक्कासाठी खंभिरपणे उभे राहून कंपनी व्यवस्थापनाशी भांडत कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची ताकद पुगलिया आजही स्वतः ठेवतात.
मात्र त्यांच्या या कामगार क्षेत्रात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.
जिल्ह्यात अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, एसीसी सिमेंट, मराठा अंबुजा सिमेंट कामगार संघटना अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
जिल्ह्यातील सिमेंट उद्योगातील कंत्राटी कामगारांना मिनिमम वेजनुसार पगार कमी असल्याने कामगारांना उदरनिर्वाहासाठी अडचणी निर्माण होत होत्या त्यावेळी सिमेंट उद्योगातील कामगार संघटनांनी एकत्र येत नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात वर्ष 2011 पासून कामगारांच्या वेतनवाढीसाठी संघर्ष सुरू केला होता कामगारांना प्रत्येकी 3 वर्षानंतर पगारवाढ मंजूर झाली मात्र 31 मार्च 2020 ला हा करार संपुष्टात आला त्यावेळी कोरोना महामारी सुरू असताना सिमेंट व कामगार आयुक्त प्रबंधन बैठक पुढे ढकलत होते. कामगार संघटनेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांच्या खंभिर नेतृत्वामुळे सर्व कामगार संघटनांनी व्यवस्थापनाशी चर्चा करीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
त्या निर्णयानुसार आता कुशल कामगारांना 114 रुपये, अर्धकुशल कामगारांना 107 व अकुशल कामगारांना 100 रुपयांची पगारवाढ करण्यात आली.
याशिवाय प्रत्येक 6 महिन्यात कामगारांना अलाऊन्स वाढ व सिमेंट कंपनीत कंत्राटी कामगारांना गणवेश मिळणार आहे.
कामगार नेते नरेश पुगलिया यांचं नेतृत्व क्षमतेमुळे आज कामगारांना फायदा झाला मात्र हा निर्णय विजय क्रांती च्या जिव्हारी लागला.
याबाबत कामगार संघटनेद्वारा माहिती देण्यात आली असून मंत्री वडेट्टीवार यांनी सिमेंट कंपनी प्रबंधनातील अधिकाऱ्यांना दमदाटी केली व उद्योग चालवायचे असतील तर आमचे ऐकावे लागेल असा दम सुद्धा दिला, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत काही कंत्राटी कामगारांना हाताशी घेत त्यांनी विजय क्रांती कामगार संघटना स्थापन करीत मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना संघटनेचं अध्यक्षपद सुद्धा दिला. Ultratech Cement trade union chandrapur
मात्र कायद्याप्रमाणे मान्यता प्राप्त युनियन सह चर्चा केल्यावर निर्णय होत असतात हे कदाचित मंत्री महोदयांना माहीत नसेलचं! News34 Chandrapur
पालकमंत्री वडेट्टीवार यांनी आधी जिल्ह्याकडे लक्ष द्यावं सध्या चंद्रपुरात अवैध धंद्याची गंगा वाहत आहे, पोलिसांचं वचक अवैध धंदे व्यवसायिकांवर नाही, पोलिसांचं काम आता लोकप्रतिनिधी यांना करावे लागत आहे, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी 1 कोटी रुपयांची अवैध दारू पकडली, जुगार, कोळसा माफिया, वाळू तस्करी, कोंबडा बाजार, अमली पदार्थ तस्करी यांचं प्रमाण वाढत आहे याकडे मंत्र्यांच मुळीच लक्ष नाही पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या या भ्रष्ट कामाबद्दल लवकरच कांग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेत अश्या भ्रष्ट मंत्र्यांना तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची विनंती करणार असल्याची माहिती कामगार संघटनांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
