चंद्रपूर - शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक भान जपणाऱ्या अश्याच शिक्षकांची आज राष्ट्राला खरी गरज आहे असे शिक्षक आज या कार्यक्रमात मला आढळले असे प्रतिपादन किशोरभाऊ जोरगेवार आमदार चंद्रपूर यांनी पुरोगामी शिक्षक संघटनेद्वारे आयोजित शिक्षकांचे रक्तदान शिबिर, कोविड योद्धा सत्कार कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
कार्यक्रमाचे उदघाटन आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते संपन्न झाले, तर पुरस्कार वितरण प्रकाशभाऊ देवतळे जिल्हाध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, देवरावदादा भोंगळे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, डी.के.आरिकर सामाजिक कार्यकर्ते, महा.शासन तीन पुरस्कार प्राप्त, तथा प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, मा.अनिल फुलझेले माजी उपमहापौर, विद्यमान नगरसेवक म.न.पा.चंद्रपूर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय भोगेकर राज्य नेते, प्रमुख अतिथी अल्काताई ठाकरे, राज्याध्यक्ष महिला मंच, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस, दीपक वरहेकर जिल्हा नेते, नारायण कांबळे जिल्हाध्यक्ष, सुनीता इटनकर महिला जिल्हाध्यक्ष, नारायण कोटकर माजी अध्यक्ष न.प.शाखा हे प्रामुख्याने उपस्थित होते. ((Chandrapur Teacher ) MLA Kishor Jorgewar
यावेळी बोलतांना प्रकाश देवतळे म्हणाले कोविड च्या या कठीण काळात विविध प्रकारची सेवा देत शिक्षकांनी कोविड योद्धा आहोत हे सिद्ध केले आहे, देवरावदादा भोंगळे यांनी कोविड काळात रक्तदान करून गरजूना मदत करत पुरोगामी शिक्षक संघटनेने सामाजिक भान जपले आहे असे विचार व्यक्त केले, डी.के.आरिकर यांनी 2 हजार शिक्षकांचा सन्मान करून पुरोगामी संघटनेने शिक्षकांनी कोविड मध्ये केलेल्या सेवेसाठी योग्य सन्मान केला आहे असे विचार मांडले.
पुरोगामी शिक्षक समितीच्या वतीने स्थानिक दुर्गा माता मंदिर तुकुम चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील 70 शिक्षक व त्यांचे नातेवाईक यांनी रक्तदान व प्लाझ्मा दान केले, स्पर्षदर्शिका या डिजिटल दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले, जिल्ह्यातील 100 शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात कोविड योद्धा पुरस्कार देण्यात आला, अश्या जिल्हाभरातील 2000 शिक्षकांचा सन्मान संघटना करणार आहे, मागील वर्षात सेवानिवृत्त झालेल्या 32 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा पुरस्कार प्राप्त 6 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. उर्वरित शिक्षकांचा सन्मान तालुका शाखा करणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखिल तांबोळी जिल्हा कोषाध्यक्ष यांनी, आभार प्रदर्शन नारायण कांबळे जिल्हाध्यक्ष यांनी,
संचालन एकता बंडावार व लोमेश येलमुले यांनी केले. प्रेरणा गीत ज्योती गावंडे, मंजुषा मानलवार, शारदा कंचर्लावार यांनी सादर केले, पाहुण्यांचे स्वागत रोपटे, शालश्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. कार्यक्रम नियोजनात विविध जबाबदारी दुष्यंन्त मत्ते, राजू चौधरी, अशोक दहेलकर, गुलाब मातेरे, प्रशांत कावळे, पंकज उद्धरवार, मनोज बेले, मंगेश साखरकर, श्याम पाचघरे, सुलक्षणा गायकवाड, मंजुषा फुलझेले, माधुरी निंबाळकर, शालिनी देशपांडे, शुभांगी तांबोळी, पौर्णिमा मेहरकुरे, रजनी मोरे यांनी सांभाळली तर संजय चिडे, संदीप कोंडेकर, कैलास कोसरे, अतुल तिवाडे, नरेंद्र डेंगे, रवींद्र पाकमोडे, निरंजन गजबे, रामेश्वर मेश्राम, पुष्पांकर बांगरे, जगदीश ठाकरे, नरेंद्र मुंगले, गोविंदा गोहणे, रफिक शेख, गजानन चिंचोळकर, सुनील जाधव, रोहिदास राठोड, विनोबा आत्राम, अनंता रासेकर, सुनील सातपुते, गणपत विधाते, संदीप चौधरी, प्रतिभा उदापुरे, सुधाकर कन्नाके, सतिष शिंगाडे, संदीप येनुगवार यांनी स्वतः उपस्थित राहत तालुक्यातील शिक्षकांना कार्यक्रमात सहभागी केले यावेळी 15 ही तालुक्यातील शेकडो पुरोगामी शिलेदार उपस्थित होते.
