ताजी बातमी - भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस शिपाई नितीन खैरमोडे याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना मुंबई येथील पवई ला घडली आहे. (Bjp Mla Ram kadam)
महिला डॉक्टरच्या गाडीला दुचाकीवर ट्रिपल सीट जाणारे भाजप आयटी सेलचे कार्यकर्ते सचिन तिवारी, दिपू तिवारी व आयुष राजभर धडकले त्यावेळी या तिघांनी वाद घालायला सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस शिपाई नितीन खैरमोडे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांना ऑटो मध्ये नेत असताना तिघांनी मिळून पोलीस शिपाई खैरमोडे याला बेदम मारहाण केली. (Beating Police in Mumbai)
खैरमोडे यांच्या चेहऱ्यावर हातातील कड्याने वार करीत रक्तबंबाळ केले.
नंतर ते तिन्ही आरोपीने तिथून पळ काढला मात्र तिघांपैकी सचिनला पोलिसांनी अटक केली.
सरकारी कामात अडथळा व कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
मात्र पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्याला सोडा अशी विनंती आमदार राम कदम यांनी दूरध्वनी द्वारे पोलिसांना केली.
त्या तिघांनी जे केलं त्याच मी समर्थन करीत नाही, त्यांच्या दोन थोबाडीत मारा पण केस आपसात मिटवा असा अजब सल्ला भाजप आमदार राम कदम यांनी पोलिसांना दिला.
भाजप आमदार कदम यांचेवर आता चहू बाजूनी टीका व्हायला लागली आहे. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांची बाजू घेण्याचा अजब प्रकार आमदाराने केल्यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा संताप दिसून येत आहे.
