नागपूर - महाराष्ट्र राज्यात १२ हजार पोलिसांच्या जागा भरण्याची प्रक्रिया मागील ३ वर्षापासून प्रलंबित आहे. वेळो वेळी राज्य सरकारने पोलीस भरती सुरू करणार अशा प्रकारची घोषणा केली व कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रत्येक वेळेस स्थगिती देण्यात आली. याचाच अर्थ राज्य सरकार पोलीस भरती प्रक्रियेवर गंभीर दिसत नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा पोलीस दलात महाभरती होणार अशा प्रकारची फोल घोषणा करण्यात आली, परंतु सरकार स्थापन होऊन सव्वा वर्ष लोटून गेले परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही. राज्याच्या वाढत्या भौगोलिक परिस्थितीमुळे पोलिस बल अपूर्ण पडत आहे. (National OBC Federation)
त्यामुळे गुन्हेगारीत वाढ होऊ शकते यात तिळमात्र शंका नाही त्यामुळे समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे व पोलिस विभागात लाखो जागा रिक्त असतांना पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत नसल्यामुळे अनेक पात्र विद्यार्थ्यांच्या वयात वाढ होत असल्यामुळे सरकारच्या या दिरंगाईमुळे समाजातील अनेक विद्यार्थी, मिळणार असलेल्या रोजगाराच्या संधीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्यात करिता पोलीस दलातील १२ हजार जागांची प्रक्रिया सुरू करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सोमवार दिनांक ११ ला सकाळी ९.३० वाजता मा.ना. अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यास गेले असता प्रशासनाने (Home Minister Anil Deshmukh) आकाशवाणी चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकर्त्यांना जाण्यास सांगितले पुढे प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री येणार आहेत असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले पुढे जिल्हाधिकारी यांना गृहमंत्र्यांकडून विचारणा करण्यात आली तेव्हा गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. गृहमंत्र्यांच्या निवासथानी झालेल्या चर्चेमध्ये महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना मा.ना. अनिल देशमुख यांनी ५,५०० हजार जागांची भरती प्रक्रिया येत्या ८ दिवसात करण्यात येईल नंतर ७,५०० व नंतर ५००० जागांची भरती अशी टप्या टप्याने ३ महिन्याच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येयील अशी खात्री दिली. याप्रसंगी पश्चिम नागपूर चे आमदार मा. विकासभाऊ ठाकरे, पदवीधर मतदार संघाचे आमदार अॅड अभिजित वंजारी, महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर, अतुल लोंढे, सहसचिव प्रा. शरद वानखेडे, डॉ. मुकेश पुडके, रेखाताई बारहाते, कल्पनाताई मानकर, यांच्यासोबत चर्चा करून मंत्र्यांनी चर्चा यशस्वी केली या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व संलग्न पदाधिकारी, हितचिंतक आणि पोलीस दलात नोकरीकरीता जाण्यास इच्छुक विद्यार्थी युवक-युवती या आंदोलनात सहभागी झाले होते. याप्रसंगी महासंघाचे त्रिशरन सहारे, शकील पटेल, संजय पंन्नासे, नाना झोडे, विजया धोटे, ईश्वर ढोले, राजेश रहाटे, सुरेंद्र मोरे, दिलीप भोयर, दिलीप गोमासे, घनश्यामजी मांगे, संजय मांगे, गणेश नाखले, अरुण वराडे, उदय देशमुख, अनंत भारसाकळे, के.झेड शेंडे, उमराव सेलोकर, रुतिका डाफ, सोनिया वैद्य, वीणा बेलगे, वीणा कुकडे, नंदा देशमुख, अनिता ठेन्ग्रे, सुनिता येरणे, लीना कटारे, सुरेखा रडके, एकादशीबाई बदुले, विनोद हजारे, शुभम वाघमारे, मयूर वाघ, वृषभ राऊत, राजू बोचरे, रवींद्र टोंगे, संजय देवाळकर, सुधाकर तायवाडे, रुचित वांढरे, श्रीकांत मसमारे, संगीता पूसदेकर, सुषमा रडके, मंगला देशमुख, फुलजेकर ताई, रोशन कुंभलकर आदी आंदोलनात सहभागी होते.
