ताजी बातमी - मला भाजपवर भरोसा नाही, त्यांच्या सरकारमध्ये बनलेली कोरोना प्रतिबंधक लस मी घेणार नाही असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी 2 दिवसाआधी केले होते.
आता त्यांच्या वक्तव्यानंतर योगगुरू बाबा रामदेव यांनी सुद्धा कोरोनाची लस घेणार नाही असे जाहीर केले.
एका वृत्तवाहिनीवर बाबा रामदेव यांनी जाहीर केले की मी लस घेणार नाही कारण मला कोरोना होऊ शकतो असे वाटत नाही, मी सुद्धा अनेक लोकांना भेटतो मात्र पूर्ण खबरदारी घेऊन पुढच्या काळात कोरोनाचे कितीही अवतार येऊ दे मला काही होणार नाहीच कारण आमचा योगावतार झिंदाबाद आहे.
कोरोनाशी घाबरण्याचे कारण नाही ज्यांना अनेक प्रकारचे आजार आहे ते सुद्धा योग करत आहे ज्यांना लसीची गरज आहे त्यांनी ती घ्यावी मी याच्या बाजूने किंवा विरोधात नाही.
सामान्य नागरिकांना लस मिळेल की नाही हा तर पुढचा भाग मात्र योग केल्याने तुमच्या आजाराचे निदान तर होऊ शकते, जीवनशैली बदलवा आरोग्य सुदृढ राहील.
असे वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे.
