चंद्रपूर - आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला ज्या आजाराने वेठीस धरले तो म्हणजे कोरोना!संपूर्ण जगाने या काळात टाळे बंदी घोषित केली,आणि यावर अंकुश मिळविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. संपूर्ण जगात कोरोना या आजारावर उपचार शोधण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली. पण केंद्रातील नरेंद्रभाई मोदी सरकारने नियोजन पूर्वक कार्य करुन त्यावर यशस्वी विजय मिळवला. कोरोनावर मात करणारी लस ही भारतातील कोरोना योद्धानां मोफत देण्यात येईल असे केंद्र सरकारने जाहिर केले. हा निर्णय अभिनंदनीय व राष्ट्रहितकारी आहे.यामुळे कोरोना योद्धांचा आत्मविश्वास वाढणार आहे,अशी प्रतिक्रिया भाजपा चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाड़े यांनी दिली आहे.
