चंद्रपूर:- बाबुपेठ येथील जनसंपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलित करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉक्टर मंगेश गुलवाडे, नगरसेवक प्रदीप किरमे,संदीप आगलावे,माजी प्राचार्य दिवाकर पुद्धटवार सर,अमोल नगराळे, बोरीकर सर, मूनगिलवार काकाजी, सुभाष ढवस, राकेश बोंमावर, रामकुमार अक्कापल्लीवार,व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन अमोल नगराडे यांनी केले तर आभार नगरसेवक प्रदीप किरणे यांनी मानले. या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका येशूका विमसरकार, साधना बारगडे,मनीषा गावंडे, विद्या वासेकर,वंदना खेडेकर,उषा मेंढे,लता पेटकर, वैशाली पूजदूरकर,पौर्णिमा चांहांदे, सुभद्रा भगत,राधा शंकूरवार, अल्का जगझापे इत्यादी अंगणवाडी सेविकेचा सावित्रीबाई फुले यांचे पुस्तकं देऊन स्वागत व करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संदीप पिंगे, प्रशांत चिकटे, रवींद्र गणवीर निखिल ननावरे व पियुष किरमे यांनी प्रयत्न केले.
