ताजी बातमी - बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असे ठरविल्यावर नवा कांग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? कुणाची या पदावर वर्णी लागणार यासाठी काही जणांच्या नावाची रस्सीखेच सुरू झाली आहे.
कांग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी सहा नावांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
यामध्ये सुनील केदार, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, राजीव सातव, पृथ्वीराज चव्हाण व यशोमती ठाकूर पक्षश्रेष्ठीं कुणाच्या नावावर शिक्का मोर्तब करणार याकडे कांग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
सहापैकी चव्हाण व सातव यांचे नाव या पदासाठी सर्वात पुढे आहे, चव्हाण हे अनुभवी असून त्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्या कोणतीही जबाबदारी दिली नसून त्यांच्यावर पक्षश्रेष्ठीं हे पद देऊन नवी जबाबदारी देऊ शकतात, दुसरीकडे राजीव सातव हे युवा व राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध असून पुढच्या काळात निवडणुकीत सातव यांना चांगला फायदा मिळू शकतो.
