नागपूर - राज्यात मराठा आणि ओबीसी समाज आरक्षण तसेच इतर मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राहायला हवे अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. तसेच, भरती प्रक्रियेवरुनसुद्धा OBC समाजातील युवकांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी राज्यातील OBC समाजामध्ये असंतोष असल्याचे सांगत यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे मेळावे घेणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच, नागपुरात ओबीसींचा महामेळावा आयोजित केला जाणार असून त्यासाठी राज्यातून एक लाख लोक येतील असेही त्यांनी सांगितलं.
ओबीसींच्या प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे सूतोवाच मंत्री विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी केले.
