ताजी बातमी/कोल्हापूर - जगात कोरोना महामारी आली नी नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला ज्यामध्ये मास्क, सोशल डिस्टनसिंग व सॅनिटायझर चा नियमित वापर करण्यास सुरुवात झाली मात्र या नियमातील सॅनिटायझर ने एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापुरातील बोरवडे गावातील सुनीता काशीद या महिलेचा सॅनिटायझर च्या बाटलीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
सुनीता ह्यांनी आज सकाळी घरातील केर कचरा बाहेर काढला व घरासमोर जमा केल्यावर त्या पेटवायल्या लागल्या मात्र त्या कचऱ्यात सॅनिटायझर ची बॉटल होती, कचरा पेटवते वेळी त्या बॉटलीचा स्फोट झाला स्फोट इतका भीषण होता की त्या आगीत सुनीता तब्बल 80 टक्के होरपळल्या.
सॅनिटायझर हे अत्यन्त जवलनशील पदार्थ आहे त्याचा वापर खबरदारी घेत करावा.
