जिवती - महाराष्ट्राचे शेवटचे टोक व "तेलंगणा" राज्याच्या सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागातील "कुंभेझरी" या गावात कॉग्रेस भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश पार पडला. (BJP and Congress workers join NCP in Chandrapur district)
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष राजेन्द्र वैद्य,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ पंकज पवार,ज्येष्ठ नेते सय्यद आबिद अली,पक्षनिरीक्षक मेहमूद मुसाभाई, दयानंद राठोड, विद्यार्थी तालुकाध्यक्ष मुकेश चव्हाण,सीताराम भुरे, अयुब शेख, अख्तरलाला, नरसिंग कांबळे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, पंकज पवार व अबिद अली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी गावा गावात पक्ष संघटन बळकट करून "गाव तिथे राष्ट्रवादी" हे अभियान राबवून गावांमधील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे व आगामी जि.प./पं.स निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.यावेळी शेकडो पुरूष महीला कार्यकर्त्यांचा पक्षाचे दुपट्टे टाकुन पक्ष प्रवेश घेण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन चक्रधर टोगरे यांनी केले.
