भंडारा - शनिवारी मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील त्या आगीने 10 कुटुंबाचं आयुष्य उध्वस्त झाले, त्या आगीत 10 चिमुकले बाळ दगवल्याने संपूर्ण देशाचं मन सुन्न झालं होतं.
रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका त्या 10 निष्पाप बालकांना बसला.
या घटनेत भानारकर कुटुंबाची कहाणी मन हेलवणारी आहे, हिरकण्या भानारकर या 4 वेळा गरोदर राहिल्या मात्र चारदा त्यांनी मृत बाळाला जन्म दिला. (10 babies die in bhandara government hospital)
भानारकर दाम्पत्यांनी न खचता कुटुंब पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला, हातावर पोट असणारे भानारकर दाम्पत्यांनी खाजगी दवाखान्यात उपचार घेत, महागडी औषधे घेतली व 6 जानेवारीला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात गोड्स मुलीला जन्म दिला.
मात्र त्या बाळाचे वजन हे 1 किलोग्राम असल्याने तात्काळ त्या चिमुकलीला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयातील अतिदक्षता शिशु सेंटर मध्ये त्या चिमुकलीला ठेवण्यात आले होते.
त्या विभागात ती चिमुकली 2 दिवस राहली पण 8 जानेवारीच्या रात्री लागलेल्या आगीत ती निष्पाप बालिका होरपळून मृत्युमुखी पडली.
मागील 4 अनुभव पाठीशी असतांना भानारकर कुटुंबियांवर त्या घटनेने जणू दुःखाचे आभाळ कोसळले.
शासकीय रुग्णालयाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका त्या 10 चिमुकल्यांचा जीवाला बसला.
