ताजी बातमी - कोरोना संसर्गाच्या काळात सर्वसामान्य लोकांना वाढीव बीजबील आलं. हेच वाढीव वीजबील कमी करुन लोकांना दिलासा देऊ, असं आश्वासन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिलं होतं. मात्र काहीच दिवसांत त्यांनी त्यांच्या आश्वासनावरुन यू-टर्न घेतला. आपल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही, हे लक्षात आल्यानंतर उर्जामंत्र्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला.
वीज ग्राहकांनी वीज बिल भरलं नाहीतर महावितरणनं वीज कापण्याचा इशारा दिलाय. सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचं सांगत सरकारने भानावर येऊन ज्या जनतेने आपल्याला सेवेची संधी दिलीय त्या जनतेच्या भल्याचे निर्णय घ्यावेत, असं मनसेने म्हटलं आहे. Maharashtra energy Minister nitin raut cheated
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबीलासंदर्भात यूटर्न घेतल्याने त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेने केली आहे. यासाठी राज्यातील सर्व पोलिस स्थानकांमध्ये तक्रारी देण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते-कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. Raj thakarey mns maharashtra
