चंद्रपूर - जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात लोककल्याण बहुउद्देशीय शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्वामी विवेकानंद मतिमंद मुलांची शाळा व स्वामी विवेकानंद मुलाचे बालगृह वर्ष 2011 पासून अविरत सुरू आहे मात्र मतिमंद शाळेला शासनातर्फे अजूनही अनुदान प्राप्त झाले नसून सध्या 7 विद्यार्थी शाळेत असून त्यामधील 2 विद्यार्थी हे 18 वर्षाखाली असून उर्वरित 5 विद्यार्थी हे 18 वर्षावरील आहे. News34 Chandrapur
मतिमंद शाळेत नियमानुसार 18 वर्षेआतील असणाऱ्या मुलांना ठेवता येते मात्र सर्व मुले हे अनाथ असल्याने संस्था अजूनही मुलांचे पालन करीत आहे मात्र शासनाद्वारे कसलीही मदत शाळेला मिळाली नाही. MLA KISHOR JORGEWAR
संस्थेचे सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला, मात्र निष्ठुर शासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करायचे, अखेर संस्थाचालकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसत 25 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर आमरण उपोषणाला सुरूवात केली.
आज पहिल्या दिवशी संस्था अध्यक्ष पेटकर व सचिव पुरुषोत्तम चौधरी यांनी न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी उपोषण मंडपात आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
आमदार जोरगेवार यांनी आंदोलकांना धीर देत आपल्या संपूर्ण समस्या व आज आपल्यावर काय परिस्थिती ओढावली आहे याबाबत संबंधित विभागाला पाठपुरावा करून सर्व समस्या निकाली काढण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असे सांगितले.
अनाथ बालकांना संस्थेने आजपर्यंत स्वतःच्या हिमतीवर सांभाळून घेतले मात्र संस्थाचालकांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, यावर शासनाला मी तात्काळ माहिती देत न्याय मिळवून देऊ असे आश्वासन आमदार जोरगेवार यांनी दिले.
आज जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवन ला आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व मंत्र्यांची उपस्थिती होती मात्र आमदार जोरगेवार यांना सोडून एकानेही उपोषण मंडपाला भेट दिली नाही ही शोकांतीकाचं म्हणावी लागेल.
