नागपूर - तरुण आणि तरुणीचा वादात मध्यस्ती करणे 40 वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले.
मात्र ती महिला वादात मध्यस्ती करताना बघून तरुण चांगलाच संतापला व त्या महिलेवर पेट्रोल टाकून जाळून दिले.
ही घटना नागपूर येथील सदर भागातील अंजुमन पॉलिटेक्निक कॉलेज जवळील हल्दीराम समोर घडली.
मध्यस्ती करणाऱ्या मृतक महिलेचे नाव 40 वर्षीय शबाना अब्दुल जावेद आहे, ही महिला टाटा मोटर्स येथे काम करीत होत्या, शुक्रवारी काम आटोपून ही महिला आपल्या मोपेडणे घरी जात होत्या.
मात्र त्यावेळेस सदर येथील हल्दीराम समोर तरुण व तरुणीचा वाद सुरू असताना शबाना ने बघितले, माणुसकी म्हणून शबाना वाद सोडवायला मध्यस्ती करायला लागल्या मात्र तरुणाला हे आवडले नाही त्याने रागाच्या भरात जवळ असलेले बॉटल मधील पेट्रोल शबानाच्या अंगावर टाकत माचीसची काडी उगारून शबानाच्या अंगावर फेकली.
त्यानंतर ते तरुण व तरुणी मोटरसायकलने पसार झाले.
शबाना जळत असताना नागरिकांनी तात्काळ पाणी टाकत आग विझवली, व शबानाला खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान शनिवारी सकाळी शबानाचा मृत्यू झाला.
पोलिसांनी गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला आहे.
