वरोरा - मी नागपूर येथून इलेक्ट्रिक फिटिंगचे सामान घेऊन येतो म्हणून 30 वर्षीय शंकर देवतळे राहणार कोंढाळी वरोरा हा 12 डिसेंम्बरला घरून निघाला मात्र मागील 13 दिवसापासून घरी परतलाच नाही.
फिर्यादी पांडुरंग देवतळे यांनी 20 डिसेंम्बरला वरोरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली की शंकर देवतळे हा 12 डिसेंम्बरला नागरपूरला जाऊन इलेक्ट्रिक फिटिंगचे सामान आणतो असे म्हणून निघून गेला मात्र तो आजपर्यंत घरी परतलाच नाही, याबाबत गावातील प्रत्येक ठिकाणी विचारपूस सुद्धा केली मात्र कुणालाही याबाबत माहिती नाही.
शंकर हा मजुरी करतो, जेव्हा तो घरून निघाला तेव्हा त्याने अंगावर पांढऱ्या ठिपके असलेला शर्ट, निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट, सोबत मोबाईल, एटीएम घेऊन गेला मात्र त्याचा मोबाईल बंद आहे.
शंकर बाबत कुणालाही माहिती मिळाल्यास याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी केले आहे.
