नागपूर - UK प्रवासाची पार्श्वभूमी असलेला आणखी 1 तरुण नागपुरात पॉझिटिव्ह आढळला असून पुन्हा आरोग्य विभागात खळबळ माजली आहे.
UK प्रवास करून आलेले आतापर्यंत 4 जण पॉझिटिव्ह आढळल्याने आरोग्य प्रशासनाने सतर्कता बाळगून त्या चारही रुग्णांना विशेष वार्ड मध्ये ठेवण्यात आले आहे.
याआधी 1 तरुण UK प्रवास पार्श्वभूमी असलेला आढळलेला होता मात्र तो कोरोनाचा नवा स्ट्रेन नसल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा निःश्वास सोडला मात्र आज सकाळी 1 महिला व मुलगी पॉझिटिव्ह आणि सायंकाळी पुन्हा पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांचा कोरोना नवा स्ट्रेनचा आहे की नाही यासाठी त्यांचे नमुने सुद्धा प्रयोगशाळेत पाठविल्या जाणार आहे.
