चंद्रपूर : विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक वरोरा येथे समितीचे संयोजक राम नवले, माजी आमदार वामनराव चटप यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कोअर कमिटी सदस्यपदी उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे विदर्भ आंदोलन समितीला बळकटी मिळाली असून गाव पातळीवर संघटनात्मक बांधणीसाठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
विदर्भ राज्य होत पर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार विदर्भ राज्यसमितीने केला आहे.
