चंद्रपूर - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गांजा विक्री आणि त्याचे वाढते सेवन यावर प्रतिबंधक कारवाई करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने राजुऱ्यात मोठी कारवाई करण्यात आली असून या कारवाईत तब्बल 70 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की शिवाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात गांजा ची विक्री होणार आहे.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई पथक तयार करण्यात आले.
शिवाजीनगर येथील सतीश तेलजीलवार याच्या संदर्भात पोलिसांनी विचारपूस केली असता तो दुसरीकडे किरायाने राहत असल्याची माहिती मिळाली व त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने त्या जागी चौकशी करीत घराची झडती घेतली.
झडती कारवाईत गाद्याच्या खाली गांजा लपविलेला होता जप्त गांजाचे वजन हे 70 किलोच्या आसपास असून त्याची किंमत 8 लाख 30 हजार 220 रुपये होती.
स्थानिक गुन्हे शाखा पथकातील संदीप कापडे यांनी 4 आरोपींना ताब्यात घेत त्यांना राजुरा पोलीस स्टेशनला आणण्यात आले.
यामध्ये आरोपी नामे 22 वर्षीय सतीश तेलजीलवार, सुनील दादा मडावी, नजीरशहा शहेनशहा, पुरुषोत्तम जंजीर्ला यांना अटक करण्यात आली, 4 आरोपीपैकी 2 हे राजुरा व 2 गडचांदूर येथील रहिवासी आहे.
या कारवाईत एकूण 10 लाख 41 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, संदीप कापडे, पद्माकर भोयर, नितीन जाधव, राजेंद्र खणके, राजकुमार देशपांडे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.
