चंद्रपूर - भारतरत्न श्रद्धेय स्व पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी संपूर्ण जीवन राष्ट्राला अर्पण केले.एक एक राष्ट्रप्रेमी नागरिक घडवितांना त्यांनी हे राष्ट्र म्हणजे माझा परिवार हा मूलमंत्र आम्हाला दिला.जनसेवेचे व्रत जोपासत त्यांनी भरतमातेची सेवा केली.हाच मूलमंत्र स्वीकारत आम्हाला पुढील मार्ग प्रशस्त करायचा आहे.जनसेवेचे व्रत जोपासणे,हीच श्रद्धेय अटलजींना आदरांजली असेल,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष (श)डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.
ते भारतीय जनता पार्टी व भाजयुमो महानगरच्या संयुक्तवतीने भारतरत्न माजी पंतप्रधान स्व अटलबिहारी बाजपेयींच्या ९५ व्या जयंतीदिनी आयोजित स्वेच्छा रक्तदान कार्यक्रमात शुक्रवार(२५डिसें)ला उत्तर भारतीय संघ सभागृहात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी भाजपा(श) महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरुनूले,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,नगरसेवक अनिल फुलझेले, तुषार सोम, रामपाल सिंह,पुष्पा उराडे,शीला चव्हाण माया उईके, संदीप आवारी,सोपान वायकर,प्रमोद शास्त्रकार, प्रज्वलंत कडू,प्रमोद क्षिरसागर, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी श्रद्धेय अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.विशेष म्हणजे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही रक्तदानस्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला व आदरांजली अर्पण केली.
डॉ गुलवाडे पुढे म्हणाले,श्रद्धेय अटलजींच्या विचारांवर चालणारा आपला पक्ष आहे.जेथे त्याग,समर्पण व सेवेला महत्व आहे.राष्ट्रप्रेम-राष्ट्रभक्ती जोपासणारा समाज निर्माण करण्याचे कार्य आम्हास करायचे आहे.
कार्यक्रमाचे संचालन भाजयुमो महामंत्री सुनील डोंगरे यांनी केले,नगरसेवक संदीप आवारी यांनी आभार मानले.
या प्रसंगी संदीप देशपांडे,सत्यम गाणार, यश बांगडे, आकाश ठुसे,प्रणय डंबारे,संजय पटले,राहुल पेटकर, सलमान पठाण, प्रवीण उरकुडे, श्रीकांत भोयर, साजिद कुरेशी, सुबोध कासुलकर, तेजा सिंग,कृष्णा चंदावार, चंद्रप्रकाश गौरकार, एडवोकेट सुरेश तालेवार, व रामकुमार अका पेलिवार यांची उपस्थिती होती.