चंद्रपूर:- चंद्रपूर शहरालगत असलेल्या माना टेकडी परिसरात मोठया प्रमाणात झाडे-झुडपे असल्याने या परिसरात शहरातील अनेक नागरिक भ्रमंतीसाठी येत आहेत. परंतू गेल्या काही महिन्यांपासून भिवापूर परिसरालगत मोठया प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने या परिसरातील निसर्गाची मोठया प्रमाणात हानी होत असल्याने याची दखल घेवून वृक्षतोडीवर आळा घालण्याची मागणी माना निसर्ग भ्रमंती मंडळातर्फे अनुप चिवंडे यांनी केली आहे.
याबाबत अधिक स्पष्टीकरण देतांना भ्रमंती मंडळातर्फे सांगण्यात आले की, माना टेकडी परिसरात मोठया प्रमाणात झाडे-झुडपे असल्याने या परिसरातील निरामय वातावरणात चंद्रपूर शहरातील नागरिक मोठया प्रमाणात भ्रमंती व व्यायामासाठी येत असतात. परंतू गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरातील भिवापूर भागातून मोठया प्रमाणात वृक्षतोड करण्याचा प्रकार सुरू असून याबाबत स्थानिक प्रषासन आणि वनविभाग अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. अशाच प्रकारे मोठया प्रमाणात वृक्षतोड होत राहिल्यास या परिसराची रया गेल्याशिवाय राहणार नाही अशी भीती भ्रमंती मंडळातर्फे वर्तवण्यात येवून या अवैध वृक्षतोडीविरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अषी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत माना भ्रमंती मंडळातर्फे श्री. अनुप चिवंडे यांच्या नेतृत्वात वनविभाग आणि प्रशासनाला वृक्षतोडीला तातडीने आळा घालण्यासाठी या भागात नियमित गस्त घालणे आणि अवैध वृक्षतोड करणाÚयावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळात अनुप चिवंडे, विजय चहारे, सुशिल भागवत, प्रमोद आंबटकर, कालीदास वाटगुरे, आनंदराव लोनगाडगे, दिनेष षेलार, किशोर आकोजवार, राजू शास्त्रकार, देविदास तपासे, श्रीराम चहारे आदी माना भ्रमंती मंडळाचे सदस्य उपस्थित होते. प्रशासनाने भ्रमंती मंडळाच्या मागणीची दखल घेवून अवैध वृक्षतोड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. चंद्रपूर शहरात मोठया प्रमाणात प्रदुषण असल्याने शहरालगत असलेल्या या झाडी-झुडूपांचे संरक्षण करणे अत्यावश्यक असल्याचे सांगत प्रशासनाने तातडीने दखल घेवून वृक्षतोडीला आळा घालावा अशी मागणी सार्वत्रिक होत आहे.
