गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच चंद्रपूर येथे भेट दिली असता यांच्या प्रमुख उपस्थितीत,राकाँ जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,राजूरा विधानसभा प्रमुख अरूण निमजे,गडचांदूर नगरपरिषद उपाध्यक्ष तथा राकाँ तालुकाध्यक्ष शरद जोगी,राकाँ जेष्ठ नेते सैय्यद आबीद अली यांच्या नेतृत्वात शासकिय विश्रामगृह येथे गडचांदूर युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष वैभव गोरे,गडचांदूर युवासेनेचे माजी शहराध्यक्ष मयुर एकरे तसेच बिबी येथील हबीब शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.यावेळी गडचांदूर नगरपरिषद नगरसेवीका अश्विनी कांबळे,नगरसेवीका मीनाक्षी ऐकरे सह इतर मान्यवरांची प्रमुख्याने उपस्थिती होती.गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची मालिका सुरू असल्याने राजूरा विधानसभेत राकाँची ताकद वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे हे मात्र विशेष.
