नागपूर - भाजपच्या 55 वर्षाच्या गडाला कांग्रेसने सुरुंग लावल्यानंतर भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांच्या अडचणीत मात्र थोडीफार वाढ होताना दिसत आहे.
आज 21 डिसेंम्बरला संदीप जोशी यांनी महापौर पदाचा राजीनामा देत राजकीय वर्तुळातील सुरू असलेल्या चर्चाना विराम दिला.
राजीनामा देण्याचं मूळ कारण म्हणजेचं जोशी यांच्या महापौर पदाचा 13 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आयुक्तांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला यांचेसह उपमहापौर यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजपकडून महापौर पदासाठी दया शंकर तिवारी यांची वर्णी लागणार आहे.
महापौर जोशी यांनी आधीच सोशल मिडियाद्वारे यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले होते, नव्या लोकांना संधी देण्याची मागणी सुद्धा त्यांनी पक्ष श्रेष्ठीकडे केली होती.
