कोरपना - कोरपना व गडचांदूर शहरात अवैध धंद्यांना उत आल्याने गडचांदूर पोलीस ठाणेदार गोपाल भारती यांची तात्काळ बदली करणेबाबत कोरपना शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद मसे यांनी नगरविकास मंत्री यांचेकडे मागणी केली.
कोरपना तालुक्यात अवैध दारू, सट्टा पट्टी, अवैध रेती वाहतुकीने तालुक्याचं वातावरण ढवळून निघाले आहे.
ट्रान्सपोर्ट व अवैध रेती वाहतुकीच्या अनुचित घटना व्हायला सुरुवात झाली असून गो तस्करीचे प्रमाण वाढले आहे.
मात्र या सर्व अवैध धंद्यांना गडचांदूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांचं पाठबळ आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे, याकरिता ठाणेदार भारती यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद मसे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
