प्रतिनिधी/विक्की गुप्ता
घुगूस - घुगूस ग्रामपंचायत की नगरपरिषद अजूनही यावर संदेह कायमचं आहे, कारण 2 महिन्यांपूर्वी मंत्री वडेट्टीवार यांनी घुगूस नगरपरिषदेची घोषणा केली होती मात्र नंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्यावर सुद्धा घुगूस नगरपरिषदेची स्थापना काही झाली नाही.
आजपासून ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली असली तरी घुगूस ग्रामपंचायत निवडणुकीत कुणीही उमेदवारी अर्ज भरणार नाही असा सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आला.
कांग्रेस, भाजप, शिवसेना व सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे, आधी नगरपरिषद नंतर निवडणूका अशी जोरदार घोषणाबाजी सुरू असून प्रशासन यावर काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
