गडचिरोली - वर्ष 1993 ला जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा करण्यात आली होती. मागील 27 वर्षांपासून असलेल्या ह्या दारुबंदीला धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याकरिता दारुबंदीच्या समर्थनात 1 हजार 2 गावे पुढे आली आहे.
दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करून दारूबंदी कायम ठेवावी असे शासनाला पत्र लिहत जिल्हा दारूमुक्ती संघटनेने 838 गावांचे प्रस्ताव मुख्यमंत्री ठाकरे यांचेकडे पाठविण्यात आले आहे.
जिल्हा दारूमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांच्या पत्रासह 838 गावांचे निवेदन, संघटनेचे उपाध्यक्ष देवाजी तोफा, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कडे सादर केले.
27 वर्षांपासून टिकून असलेली दारूबंदी उठविल्यास पुन्हा सुख समाधानी असलेल्या कुटुंबात कलह निर्माण होतील, वाद विवाद वाढतील, सुख संपन्नता नष्ट होत आर्थिक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागेल त्याकरिता गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी मुळीच उठवू नये असा उल्लेख त्या निवेदनात आहे.
दारुबंदी कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गावांमध्ये अहेरी तालुक्यातील 62, आरमोरी 49, भामरागड 82, चामोर्शी 96, देसाईगंज 28, धानोरा 122, एटापल्ली 118, गडचिरोली 101, कोरची 92, कुरखेडा 89, मुलचेरा 62, आणि सिरोंचा तालुक्यातील 101 गावांचा समावेश आहे. असे एकूण 1 हजार 2 गावं दारुबंदीच्या समर्थनात उभी आहेत.
