नागपूर - पती व सासरकडून होणाऱ्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील नरेंद्रनगरात उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवित डॉक्टर पतीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात ३० वर्षीय मृतक डॉ. रुचिता रेवतकर ३७ वर्षीय यांचे पती डॉ. मंगेश रेवतकर सासू ५२ वर्षीय सुनंदा रेवतकर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. रुचिता व मंगेश या दाम्पत्याला सहा वर्षाचा मुलगा सुद्धा आहे डॉ. मंगेश हे धंतोली येथील खासगी रुग्णालयात कार्यरत असून त्यांनी वर्ष २०१६ पासून डॉ. पत्नीचा पैश्यासाठी छळ सुरु केला होता.
यासाठी सासूचे मुलाला नेहमी पाठबळ मिळत होते.
मंगळवारी डॉक्टर दाम्पत्यांमध्ये माहेरून पैसे आणण्यासाठी दोघात कडाक्याचे भांडण झाले, वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून रुचिता यांनी पंख्याला ओढणी बांधत गळफास घेत आत्महत्या केली.
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले त्यांना सुसाईड नोट मिळाले असून त्यामध्ये माहेरून पैसे आणण्यासाठी पती व सासू नेहमी छळ करीत असल्याने आज मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे.
मात्र यामध्ये माझ्या मुलाचा चांगला सांभाळ करा अशी विनंती सुद्धा रुचिता ने पत्रातून केली.
पोलिसांनी या प्रकरणी मृतक रुचिताच्या पती व सासूवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करीत आरोपीना अटक केली आहे.
