चंद्रपूर -व्यावसायिक प्रशिक्षण सध्याचे स्पर्धेच्या व मंदीच्या वातावरणात उपयुक्त असून रोटरी क्लबचा उपक्रमाबद्दल कौतुक करून या प्रशिक्षणातून यशस्वी उद्योजिका उदयाला यावी ज्यामुळे कुटुंब व्यवस्था उभारणीला येईल असे मौलिक मार्गदर्शन मनपा नगरसेवक सुभाष कासूनगोट्टूवार यांनी ब्युटीपार्लर प्रशिक्षण घेणाऱ्या युवतीसमोर मांडले.
याप्रसंगी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या वर्षा कोठेकर यांनी ही अशा प्रशिक्षणाकरिता संस्था ,संघटनांनी पुढे येण्याची गरज विशद केली.
राजुरा येथील शिक्षिका कृतिका सोनटक्के यांनी एका दिव्यांग व्यक्तीला आनंदवन निर्मित ३ चाकी सायकल प्रदान केली.
यावेळी विकलांग सेवा संस्थेला एक बैठक बेंच दिल्याबद्दल व तीन चाकी सायकल दिल्याबद्दल श्री सुभाष कासनगोट्टूवार व कृतिका सोनटक्के यांचा वृक्ष रोपटे,ग्रंथ शाल व श्रीफळ देवुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.तसेच दिव्यांग व्यक्ती खुशाल ठलाल यांना वस्त्र दान सुद्धा करण्यात आले.
या कार्यक्रमाला पूजा राखोंडे,प्रा प्राजक्ता वासेकर,शीतल इटनकर,पूजा पान्हेकर,विद्या चिताडे,प्रिया रामटेके,पल्लवी देठे , देवराव कोंडेकर,अशोक खाडे,खुशाल ठलाल इत्यादीची विशेष उपस्थिती लाभली होती.
