वर्धा - शहरातील मुथूट फायनान्स मध्ये अज्ञात चोरांनी सशस्त्र दरोडा टाकत ३ लाख रोकड सहित तब्बल साडे ३ किलो सोने घेऊन पसार झाले.
गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास मुथूट फायनान्स बँकेचं कामकाज सुरु असताना काहीजण मास्क व डोके झाकलेल्या अज्ञात इसमांनी बँकेत प्रवेश केला.
सर्व कर्मचाऱ्यांना बंदूक व चाकूचा धाक दाखवीत बँकेतील ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड व साडे ३ किलो सोने लुटून नेले.
हि सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली मात्र चेहरा झाकला असल्याने पोलिसांसमोर सुद्धा आवाहन निर्माण झाले आहे.
घटनेचा पुढील तपास वर्धा पोलीस करीत आहे.
