राजुरा - महाराष्ट्राचे पर्यावरण- पर्यटक ,तथा राजशिष्टाचार मंत्री, युवासेना प्रमुख, मा. आदित्य साहेब ठाकरे यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन, युवासेना कार्यकारी सदस्य रूपेशदादा कदम ,युवासेना जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठीजी, शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपजी गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व नवनियुक्त युवासेना जिल्हाप्रमुख इंजि. निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वात , बबनभाऊ उरकुडे माजी उपजिल्हा प्रमुख शिवसेना ,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रनित अहिरकर,यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये असंख्य युवकांनी युवासेनेत प्रवेश केला .यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख निलेशभाऊ बेलखेडे यांचा जिल्हा प्रमुख पदि नियुक्ती झाल्यानंतर प्रथम आगमनाप्रितर्थ शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे यांनी प्रत्येक गावात बुथ तेथे युथ, गाव तेथे युवासेना या युवासेना प्रमुखांच्या संकल्पनेनुसार संघटन वाढीसाठी तसेच विद्यार्थी युवक-युवतींच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे,विद्यार्थी हिताय कार्यक्रम राबवावे, राजुरा विधानसभेतील प्रत्येक महाविद्यालयात काँलेज कक्ष तयार करावे , तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध याेजना घराघरापर्यंत पोहोचविण्यासंदर्भात, व युवासेना जिल्हा च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन नंबर बद्दल मार्गदर्शन केले सोबतच शिवसेना सदस्य नोंदणी सुद्धा राबविण्यात आली. यावेळी युवासेनेचे कुनाल कुडे उपसरपंच सास्ती, आकाश राठोड,बंटी मालेकर, प्रविण पेटकर, वतन मादर, स्वप्निल मोहुर्लेगणेश चोथले यांची उपस्थिती होती. यावेळी श्रीनाथ बोल्लुवार, तन्मय थिपे, आदित्य परचाके, जहान शेख, रोहित पंदिलवार, क्रांती तुम्मावार, नासीर शेख, साहिल गोहने, प्रज्वल लोहे, पियुष कटरे, यश खोके, राहुल राजूरकर, अनिकेत भोयर, धम्मपाल लमरोड, अनिरुद्ध, विवेक मेश्राम, आर्यन, सुरज हाजीर, गणेश बुक्कावार, विराज रागीट, फैजान बैग, कल्याण सालवे,यांसोबत असंख्य युवकांनी प्रवेश केला.सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी युवासेनेचे वतन मादर यांनी विशेष परिश्रम घेतले.
