चंद्रपूर - आधी अनेक अडचणींवर मात करून युवक पत्रकारिता क्षेत्रात आपलं नाव कमवितात, वर्तमानपत्रात आपली बातमी नावाने (by line) लागावी यासाठी जी धडपड जो युवक घेतो तो पत्रकार, मात्र आता जग बदललंय प्रामाणिक पत्रकार हळूहळू नाहीसे होत आहे.
आज आक्रमक पत्रकारिता जन्माला येत आहे मात्र ती पत्रकारिता पूर्णपणे विकलेली असते, वर्तमानपत्र, स्थानिक वृत्तवाहिनी व आता डिजिटल पत्रकारिता यामध्ये डिजिटल पत्रकारिता जोमात आली असून काहींना ही नजरेत खुपायला लागली असून घडलेली घटना अवघ्या 5 मिनिटात नागरिकांच्या मोबाईवर असते, परंतु वर्तमानपत्र बाबतीत हे उलटंच नागरिकांना ती बातमी वाचण्यासाठी 1 दिवसांची वाट बघावी लागते.
चंद्रपूर जिल्ह्या राज्याच्या शेवटच्या टोकावर असून या जिल्ह्यात अनेक प्रामाणीक पत्रकार कार्यरत आहे पण काही नवख्या पत्रकारांकडून सिनियर म्हणजे आऊटडेटेड पत्रकारिता.
चंद्रपुरात नवखे पत्रकार आम्हीच जिल्ह्यातील मुख्य आहोत असे दर्शवितात विशेष करून स्थानिक वृत्तवाहिन्या मधील स्वयंघोषित पत्रकार.
हे पत्रकार पोलीस प्रशासनाशी जवळीक साधून अर्थकारणाचे काम करीत आहे.
एकाने तर बलात्काराची तक्रार पोलिसांनी घ्यायला नको म्हणून दबाव आणला, त्या पत्रकाराचे अवैध दारू विक्रीत भागीदारी आहे, या पत्रकाराच्या सोबतीला वर्तमानपत्र मधील एक स्टार आहे.
हे दोन्ही स्टार पत्रकार म्हणजेच आम्ही पत्रकारिता संघटनेचे अध्यक्ष आहो असे दर्शीवत असतात.
विशेष म्हणजे स्थानिक वृत्तवाहिन्यावर बातमी प्रसारित ती सुद्धा केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय अवैध आहे, स्थानिक वृत्तवाहिन्यांवर फक्त जनजागृती संदेश प्रसारित करण्याची मुभा आहे, बातम्या प्रसारित करण्याची नाही.
काही वर्षाआधी जिल्ह्यातील वृत्तवाहिन्या तात्काळ बंद कराव्या असे आदेश सुद्धा धडकले होते मात्र यावर कारवाई काही झाली नाही.
चंद्रपुरातील हे दोन्ही स्टार यांनी मिळून पत्रकारिता दूषित करून टाकली आहे.
