नागपूर - हुडकेश्वर पिंपळा फाट्याजवळील डांगे लॉन येथे केटर्सची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
केटरिंगच्या पैश्याच्या वादातून ही हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, ही घटना रात्री घडली असून या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे.
लग्न समारंभात अखिलेश मिश्रा नामक आचारी स्वयंपाक करीत असताना थेट किचन मध्ये आरोपींनी हैदोस घालत अखिलेश ला गंभीर जखमी केले यामध्ये अखिलेश जखमी झाला मात्र त्याचा काही वेळात मृत्यू झाला.
पोलिसांनी लगेच तपासाची चक्रे फिरवताच या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
