लातूर - जिल्ह्यात महिला अत्याचाराची किळसवाणी घटना उजेडात आली आहे.
60 वर्षीय वृद्ध महिलेवर एकाने बलात्कार केला नंतर अपमान झाला म्हणून पीडितेने आत्महत्या केली.
या संपूर्ण घटनेमुळे नागरिकांत संताप व्यक्त करण्यात आहे, ही घटना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील आहे, पोलिसांनी या प्रकरणात आरोपी किशन उगाडे ला अटक केली आहे.
आरोपी उगाडे ने पीडित महिलेला विश्वासात घेत वाकी नदीच्या शेताजवळ नेत त्या वृद्ध महिलेवर अत्याचार केला.
पीडित महिलेच्या सुनेच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, मात्र अपमान झाला म्हणून त्या वृद्ध महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या केली.
पोलिसांनी महिलेचा मृतदेह तलावाच्या बाहेर काढला असून पुढील कारवाईसाठी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला आहे.
या घटनेमुळे नागरिकांनी किशन उगाडे या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
