ताजी बातमी - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन निर्बंधाचा कालावधी 31 जानेवारी पर्यंत वाढविला आहे.
आधीच राज्यात नाईट कर्फ्यु लागू आहे.
या अधिसूचनेत दहा वर्षाखालील मूल आणि 60 वर्षापेक्षा जास्त वृद्धांनी कोरोनाच्या संक्रमनापासून वाचण्यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
31 डिसेंबरला कोणत्याही धार्मिक अथवा सांकृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
- नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक स्थळी भाविकांची मोठी गर्दी होते. यंदा गर्दी टाळा
- नववर्षाच्या स्वागतासाठी यंदा आतषबाजी टाळा, नियमांचं सक्तीने पालन करा
- नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस कठोर कारवाई करतील.
- नाईट कर्फ्यू रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत जारी असेल.
दरम्यान, 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब्ज रात्री 11 वाजेपर्यंतच खुली ठेवण्याची परवानगी आहे. 11 वाजल्यानंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट इत्यादी ठिकाणी नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे.
