News34 chandrapur
चंद्रपूर :- आज दिनांक 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वंचीत बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषणभाऊ फूसे यांच्या हस्ते राजुरा शहरातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. Woman's day gift
Vanchit bahujan aghadi news
Vanchit bahujan aghadi news
यावेळी राजूरा शहरातील मार्कंडेय पेट्रोल पंप राजुरा येथील कर्मचारी हिना शेख, विश्रामगृह राजुरा जवळील दोसा व्यावसायिक नम्रता मडावी, पोलीस विभागातील महिला शिपाई सौ. मनधरण सोनकांबळे, महिला होमगार्ड सौ. कोंडीबाई ढोले, भंगार व्यवसायीकाकडे काम करणाऱ्या गीताबाई बारशिंगे, तसेच कोर्टासमोरील चहा विक्रेत्या सरिताताई आकनूरवार, राजुरा नगर परिषद मधील महिला सफाई कर्मचारी मंगला उंदीरवाडे आणि शितल गौरकर इत्यादी कष्टकरी महिलांचा शाल श्रीफळ आणि पेढे देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वंचीत बहुजन आघाडीच्या राजुरा येथील महिला शाखा प्रमुख सौ.वैशाली दुबे, तालुका उपाध्यक्ष धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर., कार्याध्यक्ष सुभाष हजारे आदी पदाधिकारी हजर होते.
Vanchit bahujan aghadi ideology
काही राजकिय पक्षाच्या महिला मनुस्मृती चा पुरस्कार करतात परंतु त्याच मनुस्मृती ने महिलांना त्यांचे अधिकार नाकारले गेले होते संविधानामुळे महिलांना शिक्षण, रोजगार, राजकारण आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले. महिला सशक्त होत आहेत आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत आहेत.
देशात महागाई झपाट्याने वाढत असल्याने महिलांचे बजेट कोलमडून जात आहे.