News34 chandrapur
मुंबई - Bollywood चे प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचं आज पहाटे निधन झालं, याबाबत स्वतः अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट द्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली. Satish Kaushik movies
2 दिवसांपूर्वी सतीश कौशिक हे धुलीवंदनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. Best Satish Kaushik performances
अनुपम खेर आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, मला माहित आहे 'मृत्यू हे या जगाचं शेवटचं सत्य आहे!' पण मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असं लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. Satish Kaushik comedy roles
४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती! या ट्विटसोबतच त्यांनी अभिनेत्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
४५ वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती! या ट्विटसोबतच त्यांनी अभिनेत्यासोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे.
सिने कलाकार आणि चित्रपसृष्टीतील इतर लोकांसोबत खेळलेल्या या होळीचे सर्व फोटो त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्टही केले होते. अशात अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने चाहत्यांसोबतच सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी हा मोठा धक्का आहे. सतीश कौशिक हे हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेते होते. ते मुख्यतः मिस्टर इंडिया चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात, ज्यामध्ये त्यांनी कॅलेंडरची भूमिका केली होती. सतीश यांना दोनदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
Satish kaushik passed away
सतीश कौशिक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या मित्राच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या घरी आणण्यात येणार असून त्यानंतर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सतीश कौशिक हे गुडगाव येथील फार्महाऊसवर मित्राला भेटण्यासाठी गेले होते. फार्महाऊसवरून परतत असताना सतीश कौशिक यांना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांना गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले.Satish Kaushik Bollywood career
सतीश कौशिक यांनी बॉलिवूडमधील प्रत्येक प्रकारात काम केले आहे. एक उत्कृष्ट अभिनेता असण्यासोबतच ते स्क्रिप्ट लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील होते. 'जाने भी दो यारों' या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. मिस्टर इंडिया या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. राम लखन, साजन चले ससुराल अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. तो लवकरच कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. काही काळापूर्वी त्याचा फर्स्ट लूक रिलीज झाला होता. Satish Kaushik latest projects